गुकेशने 'वर्ल्ड नंबर 1' मॅग्नस कार्लसनला कोणत्या बुद्धिबळ प्रकारात हरवलं?

व्हीडिओ कॅप्शन, गुकेशने वर्ल्ड नंबर 1 मॅग्नस कार्लसनला कोणत्या बुद्धिबळ प्रकारात हरवलं?
गुकेशने 'वर्ल्ड नंबर 1' मॅग्नस कार्लसनला कोणत्या बुद्धिबळ प्रकारात हरवलं?

नॉर्वे चेस टूर्नामेंटमध्ये वर्ल्ड चॅम्पियन गुकेशने, वर्ल्ड नंबर 1 मॅग्नस कार्लसनला हरवलं.

क्लासिकल चेस प्रकारात यापुढे खेळावं की नाही याचाच विचार आता करायला हवा, अशी प्रतिक्रिया कार्लसनने या मॅचनंतर दिली.

विश्वनाथन आनंदपासून ते आता गुकेश, प्रज्ञाननंद, कोनेरू हंपी, वैशाली, विधित गुजराती या सगळ्यांची नावं आपण सातत्याने ऐकतोय आणि त्यासोबत क्लासिकल चेस, रॅपिड चेस हे शब्दही. बुद्धिबळाचे हे प्रकार काय आहेत? आणि त्यांची खासियत काय आहे?

  • रिपोर्ट : अमृता दुर्वे
  • निवेदन : सिद्धनाथ गानू
  • एडिटिंग : अरविंद पारेकर