छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहून बादशाह अकबरांविषयी काय म्हटलं होतं?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, नितिन श्रीवास्तव
- Role, संपादक, बीबीसी हिंदी
अलीगढ, हे आज तसं गजबजलेलं शहर आहे. शिक्षणाच्या माध्यमातून या शहरानं गेल्या दीडशे वर्षात फक्त भारतच नाही तर जगभरात ठसा उमवटला आहे.
अलीगढमधील मोहमेडन अँग्लो-ओरिएंटल कॉलेज आजही त्याची ओळख टिकवून आहे. हेच कॉलेज नंतर अलीगढ मुस्लीम विद्यापीठ (AMU)या नावानं ओळखलं जाऊ लागलं.
अलीगढ मुस्लीम विद्यापीठाचा परिसर अतिशय सुंदर आहे. या कॅम्पसपासून फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर या शहराचा जुना परिसर आहे. त्याचं नाव आहे बदरबाग.
या परिसरातील गल्ल्या, रस्ते आज अरुंद वाटतात. कारण तिथले बहुतांश जुने, मोठे बंगले विकले गेले आहेत. तिथे आता प्लॉटिंग झाली आहे. त्या प्लॉट्सवर तीन-चार मजली इमारती आणि फ्लॅट बांधले गेले आहेत.
मात्र आजही या भागात जुन्या काळाच्या पाऊलखुणा दिसतात. 1931 मध्ये जवळपास 12 एकरमध्ये बांधण्यात आलेल्या ब्रिटिश शैलीतील एका बंगल्याचं प्रवेशद्वार आजही उघडं असतं. प्रसिद्ध इतिहासकार आणि प्राध्यापक इरफान हबीब याच बंगल्यात राहतात.
"तुम्हाला माहीत आहे, अलीगढचं खरं नाव काय होतं"छत्रपती संभाजी महाराज यांचं चित्र (डॉ. कमल गोखले यांच्या पुस्तकातून) " loading="lazy" width="725" height="407" style="aspect-ratio:16 / 9" class="bbc-139onq"/>