'माझ्या जागेवर दुसरा कुणी असता, तर...'; सरन्यायाधीश भूषण गवई मुंबईत अधिकाऱ्यांवर नाराज झाले तेव्हा
भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्रच्या वतीने मुंबईत सत्कार झाला. यावेळी त्यांनी उपस्थितांचे आभार मानले, पण राज्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवर नाराजी व्यक्त केली.
या कार्यक्रमानंतर सरन्यायाधीश दादरला चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करायला गेले तेव्हा मात्र पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती आणि मुख्य सचिव सुजाता सौनिक उपस्थित होते.
पाहा गवई त्यांच्या भाषणात काय म्हणाले