सोपी गोष्ट : बोईंग स्टारलायनर अंतराळवीरांशिवाय असं परतणार

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट: बोईंग स्टारलायनर अंतराळवीरांशिवाय असं परतणार
सोपी गोष्ट : बोईंग स्टारलायनर अंतराळवीरांशिवाय असं परतणार

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोन अंतराळवीरांना घेऊन गेलेलं बोईंग स्टारलायनर अंतराळ यान आता या दोन अंतराळवीरांशिवायच पृथ्वीवर परतणार आहे.

या यानात निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे ते अंतराळवीरांना पृथ्वीवर परत घेऊन येण्यासाठी सुरक्षित आहे का, याबद्दल साशंकता निर्माण झाली होती. त्यानंतर हे दोन अंतराळवीर आणखी काही महिने स्पेस स्टेशनलाच मुक्काम करून स्पेस एक्सच्या यानाने परततील, असं नासाने जाहीर केलं.

आता बोईंग स्टारलायनर यान परतीचा प्रवास मानवरहित करणार आहे. बोईंग स्टारलायनर पृथ्वीवर कधी आणि कसं परतेल? बोईंगसाठी हे महत्त्वाचं का आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

  • रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
  • एडिटिंग - शरद बढे