दीड वर्षाचं युद्ध आणि विध्वंस; आता इस्रायलची नाकेबंदी नरसंहारक ठरू शकते का?

इस्रायलने गाझाला जाणारी मानवतावादी मदत पूर्णपणे बंद केली असून हल्ले सुरूच ठेवले आहेत. त्यामुळे तिथे अन्नसंकट आणखी भीषण होत चाललंय. (फोटो - 12 मे 2025)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, इस्रायलने गाझाला जाणारी मानवतावादी मदत पूर्णपणे बंद केली असून हल्ले सुरूच ठेवले आहेत. त्यामुळे तिथे अन्नसंकट आणखी भीषण होत चाललंय. (फोटो - 12 मे 2025)
  • Author, जेरेमी बोवेन
  • Role, आंतरराष्ट्रीय संपादक, बीबीसी न्यूज

इस्रायल - गाझा युद्धामुळे पॅलेस्टिनी लोकांना दुहेरी संकटाला तोंड द्यावं लागतं आहे. त्यामुळे या लोकांची परिस्थिती फार हृदयद्रावक आणि हादरवून टाकणारी आहे.

इस्रायलच्या हल्ल्यांमुळे गाझा पट्टी बेचिराख झालीय. तर दुसरीकडे पॅलेस्टिनी लोकांना अन्नपाणी, औषधं आणि इतर गोष्टींसाठी प्रचंड संघर्ष करावा लागत आहे.

पॅलेस्टिनींचा नरसंहार होण्याची भयावह स्थिती निर्माण झालीय.

संयुक्त राष्ट्रसंघ आणि इतर मानवतावादी पातळीवर मदत पोहोचवणाऱ्या संस्थांकडून याबाबतीत धक्कादायक आकडेवारी समोर येतेय. सध्याच्या घडामोडींची सविस्तर माहिती देणारा हा लेख आहे.

तुम्ही दु:ख कसं मोजता? पत्रकारांबद्दल म्हणाल तर ते प्रत्यक्ष पाहून, अनुभवून त्याबद्दल जाणून घेता.