'आम्ही युद्धाने दमलोय, हे कसं सांगायचं"गेल्या अनेक वर्षांपासून पॅलेस्टिनी लोक दोन राजकीय नेतृत्वांमध्ये विभागले गेले असल्याचं दिसतं. " loading="lazy" width="1024" height="683" style="aspect-ratio:1024 / 683" class="bbc-139onq"/>
फोटो स्रोत, Getty Images
विजयानंतर हमासने इस्रायलसोबत पॅलेस्टिनी करारावर स्वाक्षऱ्या करायला, इस्रायलला देश म्हणून मान्यता द्यायला आणि हिंसा थांबवण्याच्या सगळ्या प्रयत्नांचा विरोध केला.
इस्रायलचा स्वीकार करणारी पॅलेस्टिनी अथॉरिटी ही एकमेव संस्था भूतकाळात होऊन गेली आहे. त्यांच्या मदतीने इस्रायल आणि उर्वरित जग पॅलेस्टिनशी संवाद करू शकत होतं.
त्यामुळे हमासच्या अधिपत्याखाली आलेल्या नवीन सरकारला इस्रायल आणि त्याच्या पाश्चिमात्य मित्र देशांकडून कडक आर्थिक आणि राजकीय निर्बंधांचा सामना करावा लागला.
2007 मध्ये फतह समर्थक गटांना हमासने गाझातून हद्दपार केलं. त्यानंतर इस्रायल आणि त्याच्या पाश्चिमात्य मित्र देशांचा रोष आणखीनच वाढला. त्यांनी गाझावर कडक नाकाबंदी लागू केली.
तेव्हापासून हमास आणि फतह यांच्यातले समझोत्याचे प्रयत्न सतत फसत राहिले.
गाझात राजकीय बदल होऊ शकतो का?
युद्ध सुरू झाल्यापासून हमासविरोधात उघडपणे टीका केली जात आहे. रस्त्यावर आणि इंटरनेटवरही ते पहायला मिळतं.
अजूनही काही कट्टर समर्थक हमासच्या बाजूने आहेत. त्यात किती बदल झाला हे अचूकपणे सांगणं कठीण आहे.
गाझामध्ये ऑक्टोबर 2023 ला युद्धाची सुरूवात होण्याआधीपासूनच हमासविरोधी नाराजी आणि विरोध सुरू झाला होता असंही म्हटलं जातंय.
पण हमासच्या भीतीने विरोध दबून राहिला.

फोटो स्रोत, AFP
हमासने "जनतेचा आवाज ऐकावा आणि सत्ता सोडावी" अशी विनंती नुकत्याच झालेल्या आंदोलनानंतर फतहचे प्रवक्ते मुंथर अल हायेक यांनी केली.
हमासची सत्ता "पॅलेस्टिनी प्रश्नांसाठी धोक्याची आहे, असं त्यांनी म्हटलं.
बीबीसीने हमासपर्यंत पोहोचण्याचे अनेक प्रयत्न केले. मात्र हमासने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हमासचे अधिकारी बासेम नईम यांनी एका फेसबुक ग्रुपवर लिहिलं होतं, "आमच्या लोकांविरुद्ध होणाऱ्या आक्रमकतेविरोधात आणि आमच्या राष्ट्राशी होणाऱ्या विश्वासघाताविरोधात आवाज उठवण्याचा हक्क प्रत्येकाला आहे."
मात्र गाझामधल्या भयानक मानवी संकटाचा वापर राजकीय फायद्यासाठी करू नये, असंही नईम म्हणाले.
दुसरीकडे, हमासविरोधातलं आंदोलन पुढेही सुरू राहिल असं अनेक आंदोलकांनी बीबीसीला सांगितलं आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)