अंतराळात 'या' ठिकाणी जीवसृष्टीची शक्यता, शास्त्रज्ञांच्या अभ्यासातून निष्कर्ष

अंतराळ

फोटो स्रोत, MARK A. GARLICK

  • Author, पल्लव घोष
  • Role, विज्ञान प्रतिनिधी, बीबीसी न्यूज

विज्ञानाच्या क्षेत्रात एक प्रश्न गेल्या कित्येक वर्षांपासून सर्वांच्या मनात आहे. तो म्हणजे पृथ्वीशिवाय इतर ग्रहावर जीवसृष्टी आहे किंवा नाही?

या दिशेने वेळोवेळी अनेक संशोधन आणि अभ्यास केले गेले आणि अजूनही करण्यात येत असतात.

आता नव्याने आलेला एक अभ्यास अहवालसुद्धा याच प्रश्नाशी संबंधित आहे.

या अभ्यासात सहभाग नोंदवलेल्या संशोधनकर्त्यांच्या मते, मालवलेल्या सूर्याच्याजवळ (व्हाईट ड्वार्फ) असा एक ग्रह असू शकतो, जो जीवसृष्टीसाठी अनुकूल असू शकतो.

या अभ्यासावर शिक्कामोर्तब झाल्यास जीवसृष्टीच्या दृष्टीने अनुकूल असलेला ग्रह 'व्हाईट ड्वार्फ' ताऱ्याभोवती परिक्रमा करताना आढळण्याची ही पहिलीच वेळ असेल.

हा ग्रह ताऱ्याच्या हॅबिटेबल झोनमध्ये म्हणजेच राहण्यायोग्य क्षेत्रात असल्याचं आढळून आलं आहे.

म्हणजेच हे क्षेत्र जीवसृष्टीच्या दृष्टीने योग्य असतं. इथं थंडीही जास्त नसते किंवा उष्णताही जास्त नसते.

हा अभ्यास रॉयल अॅस्ट्रोनॉमिकल सोसायटीच्या मासिकात प्रकाशित करण्यात आला आहे.

ब्लॅकहोल

फोटो स्रोत, Eht

या संशोधनपथकाचे प्रमुख युनिव्हर्सिटी ऑफ लंडनचे प्राध्यापक जे. फरिही यांनी याविषयी बीबीसीला अधिक माहिती दिली.

हा अभ्यास खगोल अभ्यासकांच्या दृष्टीने अत्यंत नवीन असल्याचं त्यांनी सांगितलं.

ते म्हणाले, पहिल्यांदाच व्हाईट ड्वार्फजवळच्या राहण्यायोग्य क्षेत्रात असं काही आढळून आलं. अशा प्रकारे परिक्रमा करत असलेल्या दुसऱ्या जगात जीवसृष्टीची शक्यता आहे."

ग्रहाचं पृथ्वीपासून अंतर

खरं तर जेव्हा मोठे तारे मृत होतात, तेव्हा ते ब्लॅक होल बनतात, पण आपल्या सूर्यासारखे लहान तारे व्हाईट ड्वार्फ बनतात.

आपल्यातील सर्व परमाणू इंधन वापरून बाह्य पृष्ठभाग गमावून बसलेले असे हे तारे असतात.

अंतराळ

फोटो स्रोत, MARK GARLICK/SPL

सामान्यपणे हे एखाद्या ग्रहाच्या आकाराचे असू शकतात. पहिल्यांदा गठित झाल्यानंतर निळ्या-पांढऱ्या रंगाचा प्रकाश उत्सर्जित करतात. हा ग्रह पृथ्वीपासून सुमारे 117 प्रकाशवर्षे दूर आहे.

संशोधकांच्या पथकाकडे ग्रहाच्या अस्तित्वाचे प्रत्यक्ष पुरावे नाहीत. पण व्हाईट ड्वार्फच्या राहण्यायोग्य क्षेत्रात परिक्रमा करताना चंद्राच्या आकाराच्या 65 संरचनांच्या गतिविधीमुळे तिथं ग्रह असण्याचे संकेत आहेत.

प्रा. फरिही यांनी म्हटलं, "या माहितीमुळे पथक स्तब्ध झालं आहे. गति इतकी योग्य होती, की आपण त्याचा विचारही करू शकत नाही."

अंतराळात 'या' ठिकाणी जीवसृष्टीची शक्यता, शास्त्रज्ञांच्या अभ्यासातून निष्कर्ष

( एलियन्स खरंच असतात का? परग्रहावर जीवन खरंच शक्य आहे का? ऐका ही गोष्ट दुनियेची )

हॅबिटेबल झोन ताऱ्याच्या चारही बाजूंना असलेला एक पट्टा (बँड) आहे. जिथं कोणत्याही ग्रहावर पाणी उपलब्ध असू शकतं. याच्या उपस्थितीमुळे जीवसृष्टीच्या उपलब्धतेच्या शक्यता निर्माण होतात.

गोल्डीलॉक्स झोनच्या स्वरुपात याला संबोधलं जातं. म्हणजेच एखादा ग्रह ताऱ्याच्या अगदी जवळ आहे, तर तो अत्यंत उष्ण असेल. ताऱ्यापासून दूर असलेला ग्रह थंड असतो. तर बँडच्या आतील स्थिती अत्यंत योग्य असते.

या अभ्यासाचा परिणाम म्हणजे खगोल अभ्यासकांना व्हाईट ड्वार्फच्या आजूबाजूच्या ग्रहांवरील माहिती गोळा करण्याबाबत प्रोत्साहन मिळू शकेल.

ISWOTY

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)