डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि निळ्या रंगाचे नाते काय?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, तुषार कुलकर्णी
- Role, बीबीसी मराठी
'रणशिंग फुंकले तू जाळण्या गुलामी, या निळ्या सैनिकाची घे निळी सलामी…' प्रल्हाद शिंदेंनी म्हटलेलं हे गाणं असो किंवा शंभू मीणा या राजस्थानी गायकाचं 'रंग जाओ निला रंग में, रंग जाओ बाबासाहब के रंग में…' डॉ. आंबेडकरांना अभिवादन हे रंगाच्याच माध्यमातून दिलेलं आपल्याला या गाण्यातून दिसतं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या त्यांच्या कोट्यवधी अनुयायांसाठी निळा रंग हा आंबेडकरी चळवळीसाठी समानार्थी शब्दच वाटतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा मानणाऱ्या पक्षांनी तर त्यांच्या ध्वजात सुद्धा निळा रंग घेतलाच आहे. पण राजकीय पक्षाशी निगडित नसलेले डॉ. आंबेडकरांचे अनुनायी देखील निळा रंग हा डॉ. आंबेडकरांनी दिलेल्या विचारांचे प्रतीकच मानतात.
निळा रंग आणि आंबेडकरी चळवळीचं नातं अतूट आहे. हे अनेक उदाहरणांवरून दिसते.
जेव्हा बीबीसी मराठीने काही दिवसांपूर्वी 'जय भीम हा नारा कुणी दिला' हा लेख प्रकाशित केला होता तेव्हा अनेकांनी कमेंटमध्ये अशी मागणी केली होती की 'निळा रंग हा आंबेडकरी चळवळीत कसा आला");