सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनून खरंच पैसे कमावता येतात का? जाणून घ्या

सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर हे करिअर म्हणून प्रत्यक्षात नेमकं कसं आहे? जाणून घ्या

फोटो स्रोत, Getty Images

  • Author, पायल भुयान
  • Role, बीबीसी प्रतिनिधी

फोन हातात घेताच लोक सहसा बातम्या वाचण्याबरोबरच सोशल मीडियावरील व्हीडिओ पाहू लागतात. यानंतर, काही मिनिटांचे तासांत केव्हा रूपांतर होतं ते कळतही नाही.

हे व्हीडिओ बनवणारे कंटेंट क्रिएटर्स (विविध प्रकारचा लिखित, ऑडिओ, व्हीडिओ मजकूर) आजकाल सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहेत.

हे कंटेंट क्रिएटर्स इन्फ्लूएन्सर (प्रभावक) म्हणून स्वत:चे व्यवसाय देखील चालवत आहेत. पण तरीही त्याच्याकडे 'नोकरी' म्हणून पाहिले जात नाही.

फराह शेख एक व्यावसायिक कंटेंट क्रिएटर आहे.

गेल्या सहा वर्षांपासून त्या या व्यवसायाशी जोडलेल्या आहेत.

पण आजही असे अनेक लोक आहेत ज्यांना करिअरचा हा पर्याय मान्य नाही.

“माझा दिवस घरातील कामाने सुरू होतो. माझ्या मुलीला शाळेत पाठवल्यानंतर मी स्वतःला थोडा वेळ देते. यानंतर मी 11 वाजता माझे व्यावसायिक काम सुरू करते.

सर्वप्रथम, एक टीम मीटिंग असते ज्यामध्ये आम्ही विचारमंथन (ब्रेन स्टॉर्मिंग) करतो म्हणजेच भविष्यातील रणनीतीवर सखोल चर्चा होते. या बैठकीला फायनान्सपासून ते व्हीडिओ टीममधील सर्वजण उपस्थित असतात. सकाळची वेळ आमच्या कामासाठी आणि पुढील नियोजनासाठी असते."

“मी आठवड्यातून साधारणपणे 35 ते 40 तास काम करते. तुम्हाला स्क्रीनवर दिसणारा व्हीडिओ फक्त एक किंवा दोन मिनिटांचा असतो. पण तो बनवण्यासाठी अनेक लोकांची मेहनत आणि काही तास लागतात.

सुदैवाने आता माझ्यासाठी वेगवेगळी कामं करणारी एक टीम आहे, परंतु सुरुवातीला सर्व कामं मी एकटीच करायचे." असं फराह शेख यांचं म्हणणं आहे.

पण इतर काम करणाऱ्या लोकांप्रमाणे आठवड्यातून 35-40 तास काम करूनही लोक कंटेंट निर्मितीकडे खरं काम म्हणून किंवा नोकरी म्हणून पाहत नाहीत.

याचं कारण काय?

सगळे विचारतात तुम्ही काय काम करता?

कंटेंट क्रिएशनमध्ये येण्यापूर्वी फराह कॉर्पोरेटमध्ये नोकरी करत होत्या. त्यावेळी त्या अनेक ब्रँड्ससाठी डिजिटल मार्केटिंगचं काम पाहत असत.

कंटेंट निर्मितीच्या क्षेत्रात प्रवेश करण्याचा निर्णय जेव्हा त्यांनी कुटुंबाला सांगितला त्या क्षणाची त्यांना आठवण होते.

त्या सांगतात, “त्या दिवसांत मी गरोदर होते. कंटेंट निर्मिती क्षेत्रात जाण्याची इच्छा मी माझ्या पालकांकडे व्यक्त केली. त्यांना वाटले की ठीक आहे, ती हे करेल आणि मग जर तिला यात आनंद वाटला नाही तर ती कंटाळेल आणि दुसरे काहीतरी करू लागेल."

फराह शेख

फोटो स्रोत, FARAH SHEIKH

फोटो कॅप्शन, फराह शेख यांनी सहा वर्षांत इन्फ्लूएन्सर म्हणून आपली कारकिर्द घडवली.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

त्या सांगतात, 'फक्त घरातील लोकच नाही तर आजूबाजूचे लोकही याकडे छंद म्हणून बघायचे. लोक विचारायचे, तुम्ही हे करताय हे चांगलं आहे, पण तुम्ही नोकरी कुठे करता");