नवऱ्याचा मृतदेह ड्रममध्ये ठेवून काँक्रिट भरलं, पत्नीसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी 'असं' पकडलं

साहिल शुक्ला

फोटो स्रोत, SHIV PRAKASH

फोटो कॅप्शन, सौरभच्या अनुपस्थितीत मुस्कान आणि साहिल शुक्ला यांच्यात जवळीक निर्माण झाली.
  • Author, शेहबाज अन्वर
  • Role, बीबीसी प्रतिनिधी

उत्तर प्रदेशातील मेरठमधून एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आलं आहे. शहरातील सौरभ राजपूत नावाच्या व्यक्तीची त्याच्या पत्नीनंच तिच्या प्रियकरासह हत्या केल्याचं पोलिसांनी सांगितलं.

29 वर्षीय सौरभ राजपूत लंडनमध्ये काम करत होता आणि तो गेल्या महिन्यातच परतला होता.

सौरभच्या कुटुंबानं मेरठ पोलिसांकडं तो बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी तपास सुरू केला तेव्हा या गंभीर गुन्ह्याबद्दल धक्कादायक माहिती समोर आली.

सूचना- यातील काही मजकूर वाचकांना विचलित करू शकतो.

Skip सर्वाधिक वाचलेले and continue reading
सर्वाधिक वाचलेले