कोल्हापुरात दोन महिन्यांपासून साखळदंडानं बांधलेल्या महिलेची पोलिसांनी केली सुटका

व्हीडिओ कॅप्शन, कोल्हापुरात दोन महिन्यांपासून साखळदंडानं बांधलेल्या महिलेची पोलिसांनी केली सुटका
कोल्हापुरात दोन महिन्यांपासून साखळदंडानं बांधलेल्या महिलेची पोलिसांनी केली सुटका

कोल्हापुरात एका 40 वर्षीय महिलेला तब्बल दोन महिने साखळदंडानं बांधून ठेवण्यात आलं होतं.

कोल्हापूर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच, त्यांनी पीडित महिलेची सुटका केली.

पीडित महिलेला बांधण्यात आलेल्या साखळदंडाला तीन कुलुपं होती. यातली दोन कुलुपं पोलिसांनी काढली, मात्र त्यातील एका कुलपाची चावी मिळत नसल्यानं कारागिराला बोलवून, ते तिसरं कुलपही काढलं गेलं.