सत्तांतरानंतर सीरियात कशावर बंदी, कशाला सूट? बंडखोर नेत्यांनी केलं स्पष्ट

- Author, जेरेमी बोवेन
- Role, आंतरराष्ट्रीय संपादक, बीबीसी न्यूज
सतत सुरू असलेल्या युद्धांनी आता सीरिया पुर्णपणे थकला आहे. पण आता आपल्या देशाला कोणत्याही शेजारील किंवा पश्चिमेकडील देशाकडून कोणताही धोका नसल्याचं सीरियाचे नेते अहमद-अल शरा यांनी सांगितलं.
पाश्चिमात्य देशांनी सीरियावर लावलेले निर्बंध आता काढायला हवेत, असं त्यांनी सीरियाची राजधानी दमस्कसमध्ये बीबीसीला दिलेल्या मुलाखतीदरम्यान सांगितलं.
"आता जे काही झालंय त्यानंतर निर्बंध काढून टाकायला हवेत. हे निर्बंध जुन्या सरकारसाठी होते. त्रास देणारा आणि त्रास सहन करणारा दोघांसोबत सारखाच व्यवहार करून कसं चालेल"सीरियाच्या सेडनाया तुरुंगात गुप्त खोल्यांचा शोध घेण्यात आला. " loading="lazy" width="800" height="450" style="aspect-ratio:16 / 9" class="bbc-139onq"/>