भारत-पाकिस्तान संघर्षावर पोस्ट करणारे अली खान यांना जामीन; काय घडलं कोर्टात? जाणून घ्या

प्राध्यापक अली खान मेहमुदाबाद हरियाणाच्या अशोका युनिव्हर्सिटीत सहायक प्राध्यापक आहेत.

फोटो स्रोत, Prof. Ali Khan Mahmudabad

फोटो कॅप्शन, प्राध्यापक अली खान मेहमुदाबाद हरियाणाच्या अशोका युनिव्हर्सिटीत सहायक प्राध्यापक आहेत.
  • Author, दिलनवाज पाशा
  • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारत आणि पाकिस्तान संघर्ष, तसंच कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांचा पत्रकार परिषदेत समावेश करण्याबद्दल सोशल मीडियावर पोस्ट टाकणारे प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांना सुप्रीम कोर्टानं आज (21 मे) अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

प्राध्यापक अली खान यांना 18 मे रोजी हरियाणा पोलिसांनी अटक केली होती.

स्थानिक रहिवासी योगेश यांच्या तक्रारीनंतर हरियाणातील सोनीपत पोलिसांनी ही अटक केली होती. हरियाणा पोलिसांनी प्राध्यापक अली खान यांच्या विरोधात दोन समुदायांमध्ये द्वेष पसरवण्याच्या कलमाअंतर्गत गुन्हा नोंदवला होता.

प्राध्यापक अली खान हे हरियाणामधील अशोका विद्यापीठात सहयोगी प्राध्यापक (असोसिएट प्रोफेसर) म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या पत्नीनं बीबीसीसोबत बोलतना सांगितलं होतं की रविवारी (18 मे) सकाळी साडे सहा वाजता पोलीस त्यांच्या घरी आले आणि ते प्राध्यापक अली खान यांना सोबत घेऊन गेले.

याआधी या प्रकरणात हरियाणा राज्य महिला आयोगानं देखील प्राध्यापक अली खान यांना समन्स बजावून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागितलं होतं.

प्राध्यापक अली खान मेहमुदाबाद हरियाणाच्या अशोका युनिव्हर्सिटीत सहायक प्राध्यापक आहेत.

फोटो स्रोत, Ali Khan Mahmudabad/FB

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर निकाल देताना म्हटलं, "आम्ही दोन कथित आक्षेपार्ह ऑनलाइन पोस्ट्समधील मजकुराचा विचार केला आहे. या याचिकांमुळे याचिकाकर्त्यांच्या विरोधात दोन FIR नोंदवण्यात आल्या आहेत. तपास थांबवण्यासारखा काहीही प्रकार या प्रकरणात आढळत नसल्याच्या निष्कर्षाप्रत आम्ही आलो आहो. मात्र, घटनेचं स्वरूप समजून घेण्यासाठी तसंच ऑनलाइन पोस्ट्समध्ये वापरलेल्या काही शब्दांचा अर्थ समजून घेण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे निर्देश आम्ही हरियाणाच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं की, "SIT मध्ये तीन आयपीएस अधिकारी (थेट नियुक्त केलेले) असतील जे हरियाणा किंवा दिल्लीशी संबंधित नसतील. ही SIT पोलीस महानिरीक्षक (IG) किंवा त्याहून वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली कार्य करेल आणि पथकातील उर्वरित दोन सदस्य SP किंवा त्याहून वरिष्ठ दर्जाचे असतील. या तिघांपैकी एक महिला आयपीएस अधिकारी असावी. ही SIT 24 तासांच्या आत स्थापन करण्यात यावी."

जामिनासाठी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरही विचार करण्यात आला असल्याचंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. प्रस्तावित तपास सुरळीत पार पडावा यासाठी याचिकाकर्त्याला अंतरिम जामिनावर सोडण्याचे निर्देश आम्ही देतो. मात्र, त्याने मुख्य न्यायदंडाधिकारी, सोनीपत यांच्यासमोर जामिनाची हमी (बॉण्ड) सादर करेल."

दंडाधिकाऱ्याने घालून दिलेल्या काही अटींशिवाय सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याला इतरही काही सूचना केल्या आहेत.

  • याचिकाकर्ता कोणतीही नवीन ऑनलाइन पोस्ट किंवा लेख लिहिणार नाही. तपासाआधीन असलेल्या त्या दोन ऑनलाइन पोस्ट्सशी संबंधित कोणतंही भाषण देणार नाहीत.
  • भारतीय भूमीवर झालेल्या कट्टरतावादी हल्ल्यांबाबत किंवा आपल्या देशाने दिलेल्या प्रत्युत्तरासंदर्भातील कोणत्याही मुद्द्यावर मत व्यक्त करण्यास मज्जाव असेल.
  • याचिकाकर्त्याने आपला पासपोर्ट मुख्य न्यायदंडाधिकारी, सोनीपत यांच्यासमोर जमा करावा.
  • याचिकाकर्त्याने तपास प्रक्रियेत सहभागी व्हावे आणि संपूर्ण सहकार्य करावे. अंतरिम जामिनाचा एक उद्देश तपास प्रक्रिया सुलभ करणे हा देखील आहे.
काय आहे प्रकरण?

6 आणि 7 मे च्या मधल्या रात्री भारतीय सैन्यानं पाकिस्तानविरोधात लष्करी कारवाई केली. त्यानंतर कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल माहिती दिली.

त्यानंतर 8 मे ला प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. या पोस्टमध्ये त्यांनी कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांना पत्रकार परिषदेत पाठवण्याबद्दल लिहिलं होतं.

याशिवाय प्राध्यापक अली खान यांनी त्यांच्या पोस्टमध्ये भारत-पाकिस्तान संघर्ष आणि 'युद्ध करण्याची मागणी' करणाऱ्यांच्या भावनांबद्दल देखील लिहिलं होतं. त्यात त्यांनी युद्धामुळे होणाऱ्या नुकसानाची माहिती दिली होती.

हरियाणा राज्य महिला आयोगानं स्वत:हून या पोस्टची दखल घेत प्राध्यापक अली खान यांना 12 मे ला समन्स पाठवलं. या समन्समध्ये त्यांच्या या वक्तव्यामुळे 'सशस्त्र दलांमधील महिलांच्या कथित अपमान करण्याचा आणि जातीय-धार्मिक तेढ वाढवण्याचा' मुद्दा मांडण्यात आला.

प्राध्यापक अली खान यांनी हरियाणा पोलिसांनी अटक केली.

फोटो स्रोत, Vineet Kumar

फोटो कॅप्शन, प्राध्यापक अली खान यांनी हरियाणा पोलिसांनी अटक केली.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हरियाणा महिला आयोगानं त्यांच्या नोटीसमध्ये 6 मुद्द्यांचा उल्लेख करण्यात आला. तसंच यात 'कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांच्यासह युनिफॉर्ममधील महिलांचा अपमान आणि भारतीय सशस्त्र दलांमधील अधिकारी म्हणून त्यांच्या कामाला हलकं लेखण्याचा' मुद्दादेखील मांडण्यात आला.

त्याचबरोबर हरियाणा महिला आयोगानं प्राध्यापक अली खान यांना 48 तासांचा वेळ देत आयोगासमोर हजर राहण्यास सांगितलं आणि त्यांच्याकडून लेखी स्पष्टीकरण मागवलं.

त्यानंतर प्राध्यापक अली खान यांच्यावतीने त्यांच्या वकिलांनी महिला आयोगाला लेखी स्पष्टीकरण दिलं. या उत्तरात त्यांनी राज्यघटनेच्या कलम 19 (1) अंतर्गत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा मांडला.

प्राध्यापक अली खान यांच्या वकिलांनी सांगितलं की ते इतिहास आणि राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत. त्यांनी त्यांच्या 'शैक्षणिक आणि व्यावसायिक ज्ञानाचा' वापर करून वक्तव्यं दिलं आहे आणि त्या वक्तव्याचा 'चुकीचा अर्थ लावण्यात' आला आहे.

प्राध्यापक अली खान यांनी सोशल मीडियावर केलेल्या वक्तव्यांनंतर शनिवारी, 17 मे ला हरियाणामधील सोनीपत येथील योगेश या स्थानिक रहिवाशानं एक एफआयआर नोंदवली होती.

या तक्रारीच्या आधारे रविवारी (18 मे) हरियाणा पोलिसांनी प्राध्यापक अली खान यांना अटक केली आहे.

हरियाणा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 196 (1)बी, 197 (1)सी, 152 आणि 299 अंतर्गत प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.

काय म्हणाले होते अली खान

आठ मे ला प्राध्यापक अली खान यांनी एक पोस्ट टाकली होती. त्यात त्यांनी लिहिलं होतं, "उजव्या विचारसरणीचे इतके लोक कर्नल सोफिया कुरैशी यांचं कौतुक करत आहेत, हे पाहून मला आनंद झाला."

"मात्र हे लोक कदाचित याचप्रकारे मॉब लिंचिंगचे पीडित, मनमानीपणे बुलडोझरचा वापर करणं आणि भाजपाकडून द्वेष पसरवल्यामुळे बळी पडलेल्या लोकांबाबत देखील आवाज उठवू शकतात. ते म्हणू शकतात की या लोकांना भारतीय नागरिक म्हणून सुरक्षा देण्यात यावी."

प्राध्यापक अली खान म्हणाले, "दोन महिला सैनिकांद्वारे माहिती देण्याचा दृष्टीकोन महत्त्वाचा आहे. मात्र हा दृष्टीकोन वास्तवात आला पाहिजे. नाहीतर मग हा केवळ दांभिकपणा आहे."

प्राध्यापक अली खान

फोटो स्रोत, Ali Khan Mahmudabad/FB

अर्थात, प्राध्यापक अली खान यांनी याच पोस्टमध्ये भारतातील विविधतेचं कौतुक देखील केलं.

त्यांनी लिहिलं, "सरकार जे दाखवण्याचा प्रयत्न करते आहे, त्यातुलनेत प्रत्यक्षात सर्वसामान्य मुस्लिमांसमोरची परिस्थिती वेगळी आहे. मात्र त्याचबरोबर या पत्रकार परिषदेतून (कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांची पत्रकार परिषद) हे दिसून येतं की भारतातील विविधतेमध्ये ऐक्य आहे आणि एक विचार म्हणून तो अद्याप पूर्णपणे संपलेला नाही."

प्राध्यापक अली खान यांनी त्यांच्या पोस्टच्या शेवटी तिरंग्याबरोबर 'जय हिंद' लिहिलं होतं.

खान यांच्या पत्नी आणि वकील काय म्हणाले.

प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांच्या अटकेबद्दल जाणून घेण्यासाठी बीबीसीचे प्रतिनिधी दिलनवाज पाशा हे अली खान यांच्या पत्नीशी बोलले.

प्राध्यापक अली खान यांच्या पत्नी ओनाइजा यांनी बीबीसीला सांगितलं, "सकाळी साधारण साडे सहा वाजता पोलिसांची टीम अचानक आमच्या घरी आली आणि कोणतीही माहिती न देता प्राध्यापक अली खान यांना सोबत घेऊन गेली."

ओनाइजा म्हणाल्या, "मी नऊ महिन्यांची गर्भवती आहे. लवकरच माझी प्रसूती होणार आहे. कोणतंही ठोस कारण न सांगता माझ्या पतीला जबरदस्तीनं घरातून घेऊन गेले आहेत."

पोलीस ठाणे

फोटो स्रोत, Vineet Kumar

तर प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांच्या वकिलांच्या टीममधील एका वकिलानं बीबीसीला सांगितलं, "आम्ही असं मानत आहोत की त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना ट्रांझिट रिमांडवर सोनीपतला नेण्यात येत आहे. तिथे स्थानिक न्यायालयासमोर त्यांना हजर केलं जाऊ शकतं. सध्या आम्हीदेखील आणखी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत."

हरियाणा पोलिसांनी प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांच्या अटकेला दुजोरा दिला आहे.

पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर' वर वक्तव्यं केल्याबद्दल पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

प्राध्यापक अली खान यांच्या अटकेबाबत कोण काय म्हणाले.

प्राध्यापक अली खान महमूदाबाद यांना अटक करण्यात आल्यानंतर अनेक ख्यातनाम लोकांनी सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

स्वराज अभियानाचे सह-संस्थापक योगेंद्र यादव म्हणाले की प्राध्यापक अली खान यांना झालेली अटक ही धक्कादायक आहे.

त्यांनी अली खान महमूदाबाद यांची पोस्ट शेअर करत एक्स या सोशल मीडियावर लिहिलं आहे, "ही पोस्ट वाचा आणि स्वत:लाच विचारा, यात महिला विरोधी काय आहे? या पोस्टमुळे धार्मिक द्वेष कसा काय पसरतो आहे? आणि भारताचं ऐक्य, अखंडता आणि सार्वभौमत्व याला या पोस्टमुळे धोका कसा काय निर्माण होतो आहे? (एफआयआरमधील भारतीय न्याय संहितेचं कलम 152). अशा तक्रारीवर पोलीस कारवाई कशी काय करू शकतात"भारत-पाकिस्तान संघर्षाच्या काळात बातम्यांच्या विश्वासार्हतेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झाले " loading="lazy" width="800" height="450" style="aspect-ratio:16 / 9" class="bbc-139onq"/>