क्रेडिट कार्ड वापरताना 'या' 6 गोष्टींकडे कायम लक्ष द्या

महिला क्रेडिट कार्ड बघताना

फोटो स्रोत, Getty Images

  • Author, नागेंद्र साई कुंदवरम
  • Role, बिझनेस अ‍ॅनालिस्ट, बीबीसीसाठी

क्रेडिट कार्ड्स...20 व्या शतकाच्या शेवटी झालेली एक आर्थिक क्रांती. क्रेडिट कार्डला प्लास्टिक मनी असं देखील म्हणतात. कारण क्रेडिट कार्ड प्लास्टिकचं असतं.

त्याचा वापर आर्थिक बाबींसाठी होतो म्हणून. क्रेडिट कार्ड हे एखाद्या चाकू किंवा सुरीसारखं असतं. "जर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर योग्यप्रकारे, चाणाक्षपणे केला तर ते अत्यंत फायद्याचं ठरतं.

मात्र जर तुम्ही त्याचा वापर बेशिस्तपणे, अयोगरित्या केला तर मात्र तुमचा हात कापला जाऊ शकतो." म्हणजेच तुम्ही आर्थिक संकटात सापडू शकता.

त्यामुळे क्रेडिट कार्ड घेणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच किंबहुना त्याहूनही महत्त्वाचं आहे त्याचा योग्यप्रकारे वापर करणं.

विशेषत: क्रेडिट कार्डचा वापर पहिल्यांदाच करणाऱ्यांनी दक्ष राहिलं पाहिजे. कारण तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर कसा करता यावर तुमची 'क्रेडिट हिस्ट्री' अवलंबून असते.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

आता क्रेडिट हिस्ट्रीची चिंता का करायची तर, गृहकर्ज घ्यायचं असो, वैयक्तिक कर्ज म्हणजे पर्सनल लोन घ्यायचं असो...बँका किंवा वित्तीय संस्था याच क्रेडिट हिस्ट्रीला विचारत घेतात. कारण त्यातून तुमची आर्थिक शिस्त, तुमच्यावरील आर्थिक बोजा लक्षात येतो.

त्यामुळेच तुमच्या पहिल्याच क्रेडिट कार्डपासून चांगली क्रेडिट हिस्ट्री तयार करणं अत्यंत महत्त्वाचं असतं. अन्यथा भविष्यात कर्ज मिळणं कठीण होऊ शकतं.

क्रेडिट कार्ड...एक ट्रॅप नाही

आपल्यापैकी अनेकजण कर्जाकडे एक जोखीम म्हणून पाहतात. अनेकजण, घरातील वडीलधारे अनेकदा विचारतात की, "गरजा भागवण्यासाठी किंवा एखादी वस्तू घेण्यासाठी पैसे उसनवार किंवा कर्जानं घेण्याची गरज आहे का");