रणवीर अलाहाबादियाला अटकेपासून संरक्षण; सुप्रीम कोर्टाचा निर्णय

रणवीर अहलाबादिया आणि समय रैना
फोटो कॅप्शन, रणवीर अहलाबादिया आणि समय रैना

'इंडियाज् गॉट लेटंट' या शोमध्ये केलेल्या वक्तव्याप्रकरणी रणवीर अलाहबादियाविरोधात अनेक एफआयआर दाखल झालेले आहेत.

याविरोधात रणवीर अलाहबादियाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली.

त्यानंतर सुप्रीम कोर्टानं आता रणवीर अलाहाबादियाच्या अटकेला स्थगितीचा निर्णय दिला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वीच रणवीर अलाहाबादियाने सुप्रीम कोर्टात धाव घेत तातडीने सुनावणीची मागणी केली होती.

सर्वोच्च न्यायालयात रणवीर अलाहाबादियातर्फे वकील डॉ. अभिनव चंद्रचूड यांनी बाजू मांडली.

Skip सर्वाधिक वाचलेले and continue reading
सर्वाधिक वाचलेले