साऊथ डकोटाच्या जंगलात नेमकं काय रहस्य दडलंय? विश्वाच्या अस्तित्वाचं गूढ उलगडेल?

फोटो स्रोत, Matthew Kapust / SURF
- Author, पल्लब घोष
- Role, सायन्स प्रतिनिधी
ब्रह्मांड कसं निर्माण झालं, आपण यात का आहोत, याचं उत्तर शोधण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ संवेदनशील उपकरणांच्या साहाय्याने न्यूट्रिनो या सूक्ष्मकणांचा अभ्यास करत आहेत.
अमेरिका आणि जपानमधील दोन आघाडीच्या संशोधन प्रकल्पांमधून या रहस्याचा वेध घेतला जात आहे. यातील शोध ब्रह्मांड आणि मानवजातीच्या मूळाविषयीचे ज्ञान पूर्णपणे बदलून टाकू शकतो.
साऊथ डकोटाच्या जंगलांतील धुक्याच्या वर वसलेल्या एका प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ विज्ञानाच्या सर्वात मोठ्या प्रश्नांचं उत्तर शोधत आहेत- आपलं विश्व का अस्तित्वात आहे?
ते या प्रयोगात काही वर्षे पुढे असणाऱ्या जपानी शास्त्रज्ञांच्या एका स्वतंत्र टीमसोबत याचं उत्तर शोधण्याच्या प्रयत्नात आहेत.
सध्याची विश्वाची उत्पत्ती (ब्रह्मांड) कशी झाली याचा सिद्धांत आपल्या सभोवती दिसणाऱ्या ग्रह, तारे आणि आकाशगंगा यांचं अस्तित्व समजावून सांगू शकत नाही.
दोन्ही टीम्स याचं उत्तर शोधण्याच्या आशेनं न्यूट्रिनो नावाच्या एक उप-अणुगोलक कणाचा अभ्यास करणारे डिटेक्टर तयार करत आहेत.
अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आंतरराष्ट्रीय सहकार्य समूहाला आशा आहे की, या प्रश्नाचं उत्तर भूगर्भातील खोल जागेत सापडेल, जिथं 'डीप अंडरग्राउंड न्यूट्रिनो एक्सपेरिमेंट (ड्यून)' नावाचा प्रयोग सुरू आहे.
शास्त्रज्ञ 1,500 मीटर खोल जमिनीखाली तीन विशाल भूमिगत गुहांमध्ये जाणार आहेत. या गुहेची इतकी मोठी व्याप्ती आहे की, बांधकाम करणाऱ्या कामगारांचे आणि त्यांच्या बुलडोझरचे प्रमाण एखाद्या लहान प्लास्टिकच्या खेळण्यांसारखे वाटते.
35 देशांतील 1,400 शास्त्रज्ञ, 1500 मीटर खोल जमिनीखाली
या सुविधेचे विज्ञान संचालक, डॉ. जॅरेट हेइस यांनी या विशाल गुहांचे वर्णन 'विज्ञानासाठीचे कॅथेड्रल' असं केलं आहे.
डॉ. हेइस गेली सुमारे दहा वर्षं सॅनफोर्ड अंडरग्राउंड रिसर्च फॅसिलिटीमध्ये (सर्फ) या गुहांच्या बांधकामात सहभागी आहेत. या गुहा ड्यूनला वरच्या जगातील आवाज आणि किरणोत्सर्गापासून अलिप्त ठेवतात. आता, ड्यून पुढील टप्प्यासाठी सज्ज आहे.
"आम्ही अशा डिटेक्टरची बांधणी करण्यास तयार आहोत, जो आपल्या विश्वाच्या समजुतीत बदल घडवेल. अशी उपकरणं वापरून 35 देशांतील 1,400 हून अधिक शास्त्रज्ञांच्या सहकार्याने ती तैनात केली जातील, जी 'आपण का अस्तित्वात आहोत");