दोघांचं प्रेम, पतीची भीती, मग महिला भासवून 60 वर्षांच्या पुरुषाला जिवंत जाळलं आणि...

भरत अहिर आणि गीता अहिर यांना अटक करण्यात आली आहे.

फोटो स्रोत, Dinesh Sadhu

फोटो कॅप्शन, भरत अहिर आणि गीता अहिर यांना अटक करण्यात आली आहे.
  • Author, रॉक्सी गागडेकर चारा
  • Role, बीबीसी प्रतिनिधी

सूचना : या बातमीतील काही मजकूर तुम्हाला विचलित करू शकतो

गुजरातमधील पाटण जिल्ह्यातून एक खूपच धक्कादायक घटना समोर आली आहे. एका युवक आणि युवतीने विवाहबाह्य संबंध लपवण्यासाठी एका अज्ञात व्यक्तीची हत्या केली आणि त्याच्या मृतदेहाला जाळलं.

'दृश्यम' या हिंदी चित्रपटापासून प्रेरणा घेऊन युवक-युवतीने ही हत्या केल्याचे सांगितले जात आहे.

पाटण जिल्ह्यातील जाखोतारा गावात विवाहबाह्य संबंधात अडकलेल्या एका तरुण आणि तरुणीवर एका मध्यमवयीन व्यक्तीचा खून केल्याचा आरोप आहे.

हत्या करण्यात आलेल्या या मध्यमवयीन पुरुषाच्या मृतदेहाला तरुणीचे कपडे घालून, त्याला जाळून त्या तरुणीचा मृतदेह म्हणून दाखवण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपी तरुणी आणि तरुणाला अटक केली.

Skip सर्वाधिक वाचलेले and continue reading
सर्वाधिक वाचलेले