महिला आयपीएल संघांची घोषणा, या पाच शहरांना मिळाला मान

वूमन्स आयपीएल, क्रिकेट,

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, हरमनप्रीत कौर आणि स्मृती मन्धाना

महिला आयपीएल स्पर्धेत मुंबई, दिल्ली, लखनौ, बंगळुरू आणि अहमदाबाद हे पाच संघ असणार आहेत. बीसीसीआयने यासंदर्भात माहिती दिली आहे.

अदानी स्पोर्ट्सलाईन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने 1289 कोटी रुपये खर्चून अहमदाबाद संघाची मालकी मिळवली. मुंबई संघाचं मालकत्व इंडियाविन स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे असणार आहे. पुरुषांच्या आयपीएल स्पर्धेतील मुंबई संघाची मालकी याच कंपनीकडे आहे.

बंगळुरुस्थित रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या आयपीएलमधील पुरुष संघांच्या फ्रँचाइज कंपनीनेच महिला संघासाठी आवेदन जिंकलं. त्यांनी या संघासाठी 901 कोटी रुपये खर्च केले.

दिल्ली संघांची मालकी जेएसडब्ल्यू जीएमआर क्रिकेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे असणार आहे. 810 कोटी रुपयांच्या आवेदनासह त्यांनी संघाचं मालकत्व मिळवलं.

लखनौ संघ काप्री ग्लोबल होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेडकडे असणार आहे. 757 कोटी रुपये खर्चून त्यांनी हक्क मिळवले.

मुंबई, दिल्ली आणि बंगळुरू या पुरुषांच्या आयपीएल स्पर्धेतील संघांचे मालक वूमन्स आयपीएलमध्येही संघांचे मालक असणार आहेत.

पाच संघांची मिळून एकत्रित मूल्यांकन 4669.99 कोटी रुपये असणार असल्याचं बीसीसीआयने म्हटलं आहे. पाच संघांत खेळाडू कोण असणार यासाठी लवकरच खेळाडूंचा लिलाव होणार आहे. तूर्तास लिलावाची तारीख जाहीर झालेली नाही.

महिला आयपीएल

फोटो स्रोत, Getty Images

चेन्नई सुपर किंग्स संघाने महिला आयपीएल संघासाठी दावेदारी अगदी आयत्या वेळेला मागे घेतली. 5 संघ खरेदी करण्यासाठी 17 विविध कंपन्या शर्यतीत होत्या. Viacom18 कंपनीने महिला आयपीएल स्पर्धेच्या प्रसारणाचे हक्क मिळवले आहेत. पाच वर्षांसाठी ही कंपनी बीसीसीआयला 951 कोटी रुपये देणार आहे. प्रत्येक सामन्यासाठी साधारण 7.09 कोटी रुपये ही कंपनी बीसीसीआयला देईल.

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही.

X पोस्ट समाप्त

कसं असेल महिला आयपीएल?

वूमन्स आयपीएल, क्रिकेट,

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, रेणुका सिंग ठाकूर

सर्व फ्रँचाईज मालकांना खेळाडू खरेदी करण्यासाठी एकूण 12 कोटी रुपये मिळणार आहेत. पुरुषांच्या आयपीएल स्पर्धेत प्रत्येक संघासाठी आयकॉन प्लेयर अशी व्यवस्था होती. महिलांच्या आयपीएल स्पर्धेत आयकॉन प्लेयर असणार नाही.

पुरुषांच्या आयपीएल स्पर्धेत अंतिम अकरात केवळ चारच विदेशी खेळाडू खेळू शकत असत. महिला आयपीएल स्पर्धेत अंतिम अकरात पाच विदेशी खेळाडू खेळू शकतात. या पाचपैकी एक खेळाडू असोसिएट देशांपैकी एक असणं अनिवार्य आहे.

विजेत्या संघाला 6 कोटी रुपये बक्षीसाने गौरवण्यात येणार आहे. उपविजेत्या संघाला 3 कोटी तर तिसऱ्या क्रमांकावर राहणाऱ्या संघाला 1 कोटी रुपये मिळतील.

महिला आयपीएल

फोटो स्रोत, Getty Images

महिला आयपीएल स्पर्धेत कोणत्या शहरांचे संघ असणार हे आता स्पष्ट झालं आहे पण सामने कुठे खेळवण्यात येणार हे जाहीर झालेलं नाही.

मुंबईत 3 आंतरराष्ट्रीय मैदानं आहेत. वानखेडे, ब्रेबॉर्न आणि डीवाय पाटील स्टेडियम या तीनपैकी एका ठिकाणी मुंबई संघाचे सामने होऊ शकतात.

दिल्लीत अरुण जेटली इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर सामने होण्याची शक्यता आहे. अहमदाबाद इथे नरेंद्र मोदी स्टेडियम सज्ज आहे. लखनौ इथे अटल बिहारी वाजपेयी स्टेडियम इथे सामने होण्याची शक्यता आहे. बंगळुरूत चिन्नास्वामी स्टेडियमवरच सामने होण्याची शक्यता आहे.

वूमन्स आयपीएल, क्रिकेट,

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारतीय महिला क्रिकेटपटू

वूमन्स चॅलेंजद्वारे रंगीत तालीम

वूमन्स आयपीएल स्पर्धेसाठी पूर्वतयारी म्हणून बीसीसीआयने 4 वर्ष वूमन्स ट्वेन्टी20 चॅलेंज स्पर्धा आयोजित केली. पुरुषांच्या आयपीएल स्पर्धेदरम्यान महिलांच्या मॅचेस खेळवण्यात आल्या. ट्रेलब्लेझर्स, सुपरनोव्हाज आणि वेलोसिटी अशी संघांची नावं होती. तीन संघांमध्ये प्रामुख्याने भारतीय खेळाडू होत्या. त्यांच्या बरोबरीने अन्य संघातील अव्वल खेळाडूंनाही संघात समाविष्ट करण्यात आलं होतं. 2018 आणि 2019 मध्ये सुपरनोव्हा संघाने जेतेपदावर नाव कोरलं होतं. 2020 मध्ये ट्रेलब्लेझर्स संघाने तर 2022 मध्ये सुपरनोव्हाने जेतेपदाची कमाई केली. 2021 मध्ये कोरोनामुळे ही स्पर्धा होऊ शकली नाही.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)